रामदास कदम यांचे सनसनाटी आरोप, अनिल परब यांचे रोखठोक प्रत्युत्तर, नार्को टेस्टपर्यंत 'सामना'

Last Updated:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावरुन आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी कदमांना थेट इशारा दिलाय.

अनिल परब-रामदास कदम
अनिल परब-रामदास कदम
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या एका दाव्यावरुन ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावरुन आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी कदमांना थेट इशारा दिलाय. माफी मागा नाहीतर कोर्टाच्या कारवाईला सामोरं जा असं परब म्हणाले. परबांच्या टीकेला कदमांनीही प्रत्युत्तर दिलंय. यावरुन आता अनिल परब आणि रामदास कदमांमध्य़े आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.
रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. या वादाची सुरुवात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मेळाव्यात झाली. उद्धव ठाकरेंवर शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप कदमांनी केला होता. रामदास कदमांच्या या आरोपामुळं वादाचा भडका उडालाय. रामदास कदमांचे हे आरोप फेटाळून लावत अनिल परबांनी कदमांवर टीका केलीय.
advertisement
जगात कोणताही मृतदेह दोन दिवस शवघराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी ठेवता येत नाही. बाळासाहेबंचा मृतदेह दोन दिवस ठेवला गेला हा धादांत खोटा आरोप आहे, असे प्रत्युत्तर अनिल परब यांनी दिले.
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला होता. त्यालाही अनिल परबांनी उत्तर देत बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते, असा खुलासा अनिल परबांनी केलाय.
advertisement
2012 साली दिवाळीच्या सुमारास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. त्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू झालेत. अनिल परबांनी रामदास कदमांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा दिलाय. अनिल परबांचं हे आव्हान रामदास कदमांनी स्वीकारलंय. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांची नार्कोटेस्ट करण्याचं आव्हान दिलं गेलंय. दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी केलेले आरोप, त्याला अनिल परबांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर रामदास कदमांचं प्रत्युत्तर पाहता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रामदास कदम यांचे सनसनाटी आरोप, अनिल परब यांचे रोखठोक प्रत्युत्तर, नार्को टेस्टपर्यंत 'सामना'
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement