Ratnagiri Airport: विमानतळाच्या उद्घटनाचा मुहूर्त ठरला! रत्नागिरी ते मुंबई तिकीट किती?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Ratnagiri Airport: विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास फक्त एक तासात शक्य होणार आहे.
रत्नागिरी: दरवर्षी सणासुदीच्या काळात पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधून कोकणात जाणाऱ्या चारमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. अतिरिक्त रेल्वेगाड्या आणि बस असूनही कोकणात जाताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. मात्र, आता लवकरच कोकणातील लोकांसाठी प्रवासासाठी आणखी एक मार्ग खुला होणार आहे. रत्नागिरी येथे विमानतळ उभारलं जात आहे. विमानतळाचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ते रत्नागिरीकरांच्या सेवेत येईल, अशी शक्यता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त प्रयत्नातून रत्नागिरीत विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरी विमानतळ प्रकल्प हा क्षेत्रीय संपर्क योजने अंतर्गत उभारला जात आहे. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास फक्त एक तासात शक्य होणार आहे.
advertisement
रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास 326 किलोमीटरचा आहे. रस्ते मार्गे असो किंवा रेल्वेने हा प्रवास करण्यासाठी फार वेळ खर्च होतो. ज्या प्रवाशांना तातडीच्या कामासाठी प्रवास करायचा आहे, अशांची फार अडचण होत होती. मात्र, विमानसेवेमुळे हा प्रश्न सुटणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी विमानतळ एप्रिल 2026 पर्यंत कोकणवासियांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या या विमानतळावर प्रवासी टर्मिनल, रनवे, टॅक्सीवे, नेव्हिगेशन आणि सुरक्षेच्या सुविधा उभारल्या जात आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 50 ते 60 कोटी रुपयांचा खर्च येत आहे. मुंबईला जाण्यासाठी व पुन्हा येण्यासाठी 1800 ते 3000 रुपयांच्या दरम्यान विमान तिकीट दर ठेवला जाणार आहे. तिकीट दरांबाबत अचून आणि अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
September 23, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri Airport: विमानतळाच्या उद्घटनाचा मुहूर्त ठरला! रत्नागिरी ते मुंबई तिकीट किती?