वरातीमागून घोडे पळाले, ठाकरेंना कोकणात 'ऑपरेशन टायगर'ची धास्ती, तडकाफडकी घेतला निर्णय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ratnagiri shivsena UBT : रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठी खिंडार चिन्ह दिसत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.
Ratnagiri Political News : शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातोय. अशातच आता कोकणात ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) धास्ती ठाकरे गटाला बसली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी (Ratnagiri shivsena UBT) जिल्हा दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलीय.
राजेंद्र महाडीक यांची हकालपट्टी
ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळुण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने पक्षातून हाकालपट्टी केली आहे. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
एकनाथ शिंदेंची सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतील जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी शनिवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चंपक मैदानावर भव्य सभा होणार असून एकनाथ शिंदे यांच्या यांच्या उपस्थितीत ठाकरेंची पदाधिकारी धनुष्यबाण हाती घेतील. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढणार असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकांमध्ये मोठा फायदा मिळणार आहे.
advertisement
रत्नागिरीत शिंदेंचा दबदबा?
रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यातही तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून विजयी झाले. अशातच एकनाथ शिंदेंचा दौरा पक्षाला अधिकच बळकटी देणारा ठरू शकतो. शिंदेंच्या सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये.
भास्कर जाधव शिंदे गटाच्या वाटेवर?
advertisement
दरम्यान, राजन साळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरेंना पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला होता. अशातच आता भास्कर जाधव शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील ठाकरेंचा एकमेव आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा असताना ठाकरेंना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
view commentsLocation :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
February 15, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वरातीमागून घोडे पळाले, ठाकरेंना कोकणात 'ऑपरेशन टायगर'ची धास्ती, तडकाफडकी घेतला निर्णय!


