RITES Recruitment 2025: रेल्वेमध्ये बंपर नोकरभरती! 40 वर्षाच्या व्यक्तीलाही मिळू शकते सरकारी नोकरी; अर्जाची लिंक बातमीत
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
RITES Bharti 2025 Apply Online: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसने नोकर भरतीची घोषणा केली आहे. अलीकडेच नोकरभरतीची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली आहे. टेक्निकल विभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अनेक तरूणांची रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता अशातच त्या तरूणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसने नोकर भरतीची घोषणा केली आहे. अलीकडेच नोकरभरतीची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली आहे. टेक्निकल विभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नुकतंच आरआयटीईसने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) पदासाठी 600 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. नोकरभरती घोषित केलेल्या पदाबद्दलच्या महत्त्वाच्या तपशील जाणून घेऊया...
रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून ती 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. भरतीमध्ये पात्रता, एकूण रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्कासह इतर महत्त्वाचे तपशील समाविष्ट आहेत. भरती संबंधितची अधिसूचना आरआयटीईसच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी 600 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना वाचावी.
advertisement
संपूर्ण भारतामध्ये ही भरतीप्रक्रिया राबवली जाणार असून आयटीआय, बी.ई. आणि बी. टेक या पदव्या अनिवार्य आहे. कोणकोणत्या पदासाठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जाहिरातीची PDF वाचू शकता. त्या जाहिरातीच्या PDF ची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. अर्जाची लिंक सुद्धा बातमीमध्ये देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता. या भरतीमध्ये 40 पर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. सोबतच संबंधित फिल्डचा अर्जदाराला 2 वर्षांच्या अनुभवाची आवश्यकता आहे. खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर मागास वर्गासाठी 300 रूपये अर्ज शुल्क आहे, तर अनुसूचित जाती- जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि अपंग व्यक्ती यांना 100 रूपये इतका अर्ज शुल्क आहे.
advertisement
अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्ही सर्व पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. संगणक आणि आधारित चाचणीच्या आधारावर निवड प्रक्रिया केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 29,735 च्या आसपास वेतन असेल. निवड झाल्यानंतर आणि उमेदवारांना त्यांच्या विशिष्ट भूमिका आणि जबाबदाऱ्यांनुसार स्पर्धात्मक वेतन मिळेल. यामुळे निवडलेल्या सर्व उमेदवारांना संस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल योग्य मोबदला मिळेल याची खात्री होते.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 19, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RITES Recruitment 2025: रेल्वेमध्ये बंपर नोकरभरती! 40 वर्षाच्या व्यक्तीलाही मिळू शकते सरकारी नोकरी; अर्जाची लिंक बातमीत