advertisement

Rohit Pawar: अजितदादांचा अपघात घडवून आणला? रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवत सांगितले ३ पुरावे

Last Updated:

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत हा अपघात नसून सुनियोजित 'घातपात' असल्याची शंका व्यक्त केली आहे.

अजितदादांचा अपघात घडवून आणला? रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवत सांगितले ३ पुरावे
अजितदादांचा अपघात घडवून आणला? रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवत सांगितले ३ पुरावे
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील गुढ आता अधिक गडद झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत हा अपघात नसून सुनियोजित 'घातपात' असल्याची शंका व्यक्त केली आहे. विमानात क्षमतेपेक्षा जास्त भरलेले इंधन आणि 'ब्लॅक बॉक्स'मधील संभाव्य छेडछाड यावर त्यांनी बोट ठेवले आहे.
आज मुंबईत त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर दुसरी पत्रकार परिषद घेतली. दुसऱ्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमान सेवा देणाऱ्या व्हीएसआर कंपनी आणि अपघाताच्या तपास कामावर शंका व्यक्त केली. विमानात क्षमतेपेक्षा जास्त भरलेले इंधन आणि 'ब्लॅक बॉक्स'मधील संभाव्य छेडछाड यावर त्यांनी बोट ठेवले आहे.
रोहित पवार यांनी अपघाताच्या तांत्रिक बाबींवर संशय व्यक्त केला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताचे व्हिडीओदेखील दाखवले. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर स्फोट झाले. हे स्फोट विमानातील अतिरिक्त इंधन टँकमुळे झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
advertisement

विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन:

मुंबई ते बारामती प्रवासासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही विमानाच्या टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. अपघाताच्या वेळी विमानात ३००० ते ३५०० लिटर इंधन होते.

अतिरिक्त इंधन कॅन:

धक्कादायक बाब म्हणजे विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅन ठेवण्यात आले होते. विमानात जास्त इंधन असल्यास मोठा स्फोट घडवता येईल, हा यामागचा हेतू होता का? असा सवाल त्यांनी केला.
advertisement

अपघात घडवून आणला?

कमी दृश्यमानता (Visibility) असतानाही पायलट सुमित कपूर यांनी विमान माघारी न फिरवता एक गिरकी घेतली आणि विमान मुद्दाम जमिनीवर आदळले, जेणेकरून स्फोट होईल, असा गंभीर आरोप पवारांनी केला आहे.

दृश्यमानतेचे नियम धाब्यावर?

बारामतीत लँडिंगसाठी ५००० दृश्यमानता आवश्यक असताना केवळ ३५०० इतकीच दृश्यमानता होती. मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच हवामान खराब होते, तरीही या विमानाला कोणाच्या सांगण्यावरून परवानगी मिळाली? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
advertisement

VSR कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड?

विमान सेवा देणाऱ्या VSR कंपनीवर रोहित पवारांनी थेट भ्रष्टाचाराचे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप केले आहेत. मुंबईत बसणारा कंपनीचा हँडलर 'गोपी' याने दिल्लीवरून आलेल्या फ्लाईट प्लॅनमध्ये बदल केले असावेत. सध्या तपासात दिरंगाई होत आहे कारण कंपनी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात व्यस्त आहे.

ई-मेल तपासाची मागणी

मूळ फ्लाईट प्लॅन आणि बदललेले ईमेल तपासल्यास यातील सत्य बाहेर येईल, असेही रोहित पवारांनी म्हटले. तपासाला वेळ जात असल्याने माहितीच्या छेडछाडीला अवधी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar: अजितदादांचा अपघात घडवून आणला? रोहित पवारांनी व्हिडीओ दाखवत सांगितले ३ पुरावे
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement