Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rohit Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार काही मुद्दे उपस्थित करत तपास निष्पक्ष होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अजित पवारांच्या अपघाताबाबत यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे. अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. ब्लॅक बॉक्सबाबत आम्ही शंका व्यक्त केली होती. अपघातानंतर पुन्हा स्फोट झाले, त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. ११०० डिग्री सेल्सियसला जर विमान असेल तर ब्लैकबॉक्सला फटका बसू शकतो. सध्या ब्लॅकबॉक्स जळला असं सांगत असतील तर ते केवळ मॅनिप्युलेशन सुरू आहे असा आमचा आरोप असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
पायलटला ब्लॅकमेल केलंय का?
रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांना ब्लॅकमेल केलंय का, अशी शंका उपस्थित केली. रोहित पवार यांनी म्हटले की, अपघातग्रस्त विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण त्यांना होती. त्यातून त्यांना ब्लॅकमेल केलंय का, त्यातून ही मुद्दाम घटना घडली का अशी शंका आहे. त्याशिवाय, त्यांना मद्य प्राशनाची सवय होती. त्यांची दोन वेळेस ब्रेथ अॅनेलेसिस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. साधारणतः ३ ते ४ वर्षे निलंबित झाले होते. त्यानंतर कोरोना काळात बेरोजगार होते. त्यानंतर त्यांना व्हीएसआर कंपनीत कमी पगारात नोकरी मिळाली.
advertisement
जेटमध्ये असताना १०-१२ लाख पगार होता. सध्याच्या कंपनीत ३-३.५ लाखाचे वेतन होतं. त्यात त्यांना २५ हजार प्रत्येक फेरी मागे मिळायचे. महागड्या मद्याची सवय होती. कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी यामुळे तणावात होते. त्यावरून त्यांना कोणी ब्लॅकमेल केलाय का, हे ब्लॅकमेल करणारे कोण आहेत, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
अजितदादांच्या अपघातापूर्वी भाजपच्या ट्रोलरचं ट्वीट....
advertisement
रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला. समित ठक्कर या भाजपशी संबंधित असलेल्या ट्रोलरने अजित पवारांच्या अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. मात्र, हे ट्वीट त्याने काही वेळेत डिलीट केले. या ट्वीटमध्ये समित ठक्कर याने येत्या दोन दिवसात राज्यात मोठी खळबळ उडणार असून मोठी उलथापालथ होणार असल्याचे ट्वीट केले होते. मात्र, काही वेळेतच हे ट्वीट डिलीट केले. त्याबाबत आम्ही आणखी पुरावे जमा करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!







