Madhubhai Kulkarni: वरिष्ठ संघप्रचारक मधुभाईंचं निधन, मोदींना भाजपशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Madhubhai Kulkarni Passes Away: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक (मधुभाई) कुलकर्णी यांचं गुरुवारी निधन झालं.
Madhubhai Kulkarni Passed Away: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक (मधुभाई) कुलकर्णी यांचं गुरुवारी निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते वयासंबंधित आजारामुळे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. आता अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मधुभाई कुलकर्णी हे १९८५ च्या काळात गुजरातमध्ये प्रचारक म्हणून काम करत होते. त्यांनीच नरेंद्र मोदींना भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी नरेंद्र मोदी हे आरएसएसचे विभाग प्रचारक होते.
दोन आठवड्यांपूर्वी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मधुभाईंना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी डॉ. हेडगेवार रुग्णालयात भेट दिली होती. त्यांचे पार्थिव आरएसएसच्या समर्पण कार्यालयात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी भैय्याजी जोशी, राज्यमंत्री अतुल सावे आणि वरिष्ठ स्वयंसेवकांनी अंतिम संस्कारांना उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
advertisement
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेल्या काही लेखांमध्ये मधुभाईंचा उल्लेख होता. तत्कालीन आरएसएस प्रमुख बाळासाहेब देवरस यांनी मोदींना राजकारणात आणण्याचे आदेश दिले होते. यात मधुभाईंची भूमिका महत्त्वाची होती.
१७ मे १९३८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे जन्मलेले मधुभाई संघात विभागीय, उपविभागीय, प्रांतीय आणि प्रादेशिक प्रचारक म्हणून काम करत होते. त्यांच्या वाढत्या वयामुळे ते काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे राहत होते. त्यांचे देहदान करण्याच्या त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, आर.के. दमाणी मेडिकल कॉलेज येथे पाठण्यात आले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 19, 2025 6:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Madhubhai Kulkarni: वरिष्ठ संघप्रचारक मधुभाईंचं निधन, मोदींना भाजपशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका