सिनेमाला लाजवेल अशी जालन्यात घटना, कारमध्ये सागरसोबत घडलं भयानक, जालना हादरलं

Last Updated:

सागर धानुरे नावाच्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता दोन जणांना अटक केली आहे. 

News18
News18
रवी जयस्वाल, प्रतिनिधी 
जालना:  जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कलावती हॉस्पिटलसमोर एका व्यावसायिक तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळला होता. त्याच्याजवळ एक पिस्टल देखील आढळली होती. त्यामुळे आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. अखेरीस जालना पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये प्रकरणाचा छडा लावला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   जालन्यातील कलावती हॉस्पिटलसमोर एका कारमध्ये सागर धानुरे नावाच्या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता दोन जणांना अटक केली आहे. कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले अशी दोन्हीही आरोपींची नाव आहेत. पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.
advertisement
कल्याण भोजने याचे सागर धानुरे त्यांच्याशी पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद होता. मयत सागर धानुरे हा कल्याण भोजने याला पैशासाठी त्रास देत होता. त्यामुळे कल्याण भोजने याने कमलेश गाडीवाले याला धानुरे याला मारण्यासाठी 25 लाखांची सुपारी दिली. 20 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता कमलेश झाडीवाले याने सागर धानुरे यांना भेटण्यासाठी कलावती हॉस्पिटलसमोर भेटण्यासाठी बोलावलं आणि सागर धानुरे यांच्या गाडीत बसून त्यांच्या गळ्यावर गोळीबार केला. तसंच छातीवर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.
advertisement
शरिरावर चाकूचा वार आणि...
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितलं की, मयत सागर धानुरे याचा मृतदेह कारमध्ये आढळला होता. त्यावेळी त्याच्या शरिरावर चाकूने वार केला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता हत्या असल्याचा संशय आला.  त्यामुळे या दिशेनं तपास केला तेव्हा कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या दोन्ही आरोपींपर्यंत पोहोचलो. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
advertisement
आत्महत्येचा केला बनाव
कल्याण भोजने आणि मयत सागर धानुरे याच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. त्यामुळे कल्याण भोजने याने सागर धानुरे याच्या हत्येचा कट रचला. सुरुवात आत्महत्या वाटावी, असं प्लॅनिंग केलं होतं. पण, पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने तपास केला असता हत्या असल्याचं उघड झालं. कमलेश झाडीवाले याच्यावर याआधीही ६ ते ७ गुन्हे दाखल आहे, त्याच्यावर कल्याण भोजनेवर एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली कदीम जालना पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिनेमाला लाजवेल अशी जालन्यात घटना, कारमध्ये सागरसोबत घडलं भयानक, जालना हादरलं
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement