advertisement

खिशातून पैसे काढल्याचा राग, मित्रानेच केला मित्राचा डोक्यात दगड घालून खून

Last Updated:

Sangli News: मयुर सचिन साठे असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी त्याचा मित्र प्रताप हा घटनेनंतर थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.

मित्राने केला मित्राचा खून
मित्राने केला मित्राचा खून
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मयुर सचिन साठे (वय २४वर्ष, व्यवसाय- वॉचमन, रा. सोनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी त्याचा मित्र प्रताप राजेंद्र चव्हाण (वय २४वर्ष, रा. सोनी) हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठविण्यात आला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली आहे .
मयुर साठे हा तरुण वॉचमनचे काम करतो. सध्या तो मिरज तालुक्यातील सोनी या गावात कुटुंबासोबत राहत होता. मयत मयुर आणि त्याचा मित्र बुधवारी दिवसभर सोबत राहून दारू पिऊन हॉटेलमध्ये पार्टी केली. मयत मयुर साठे आणि प्रताप चव्हाण हे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांनाही दारू प्यायचे व्यसन आहे. मयत मयूर याने आरोपी प्रताप याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या कारणावरून मयूर आणि प्रताप या मित्रांमध्ये वाद झाला. या रागातून मित्राने बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला डोक्यात दगड घालून जागीच ठार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसताच मारेकरी घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
advertisement
दरम्यान, सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणिल गील्डा हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खिशातून पैसे काढल्याचा राग, मित्रानेच केला मित्राचा डोक्यात दगड घालून खून
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement