सांगलीत 'लेक लाडकी' योजना हिट! 3000 हून जास्त मुलींना मिळाले पैसे; कसा आणि कुठे कराल अर्ज?   

Last Updated:

राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लेक लाडकी' योजनेला सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, शिक्षण देणे आणि बालविवाह रोखणे या उद्देशाने...

Lek Ladki scheme
Lek Ladki scheme
सांगली : जिल्ह्यात 'लेक लाडकी' योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सक्षम करणे आणि बालविवाह रोखणे यांसारख्या महत्त्वाच्या उद्दिष्टांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा आत्तापर्यंत तीन हजारांहून अधिक मुलींना लाभ मिळाला आहे. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू असून, या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पात्र लाभार्थींपर्यंत लवकरच या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
काय आहे 'लेक लाडकी' योजना?
'लेक लाडकी' ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांना शिक्षणासाठी मदत करणे आणि बालविवाह रोखणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
पाच टप्प्यांत मिळणार 1 लाख 1 हजार रुपये
या योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण पाच टप्प्यांत 1 लाख 1 हजार रुपयांची मदत दिली जाते...
advertisement
  • जन्मानंतर : 5000 रुपये
  • इयत्ता पहिलीत : 6000 रुपये
  • इयत्ता सहावीत : 7000 रुपये
  • इयत्ता अकरावीत : 8000 रुपये
  • वय 18 पूर्ण झाल्यावर : 75000 रुपये
योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका (रेशन कार्ड) असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
advertisement
यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी आहेत : मुलीचा जन्म दाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांनी दिलेला), पालक आणि मुलीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि शाळेचा दाखला (शिक्षण घेत असल्याचा पुरावा).
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
'लेक लाडकी' योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुमच्या गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठी अर्ज उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीत 'लेक लाडकी' योजना हिट! 3000 हून जास्त मुलींना मिळाले पैसे; कसा आणि कुठे कराल अर्ज?   
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement