देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात, भरधाव कंटेनरची बसला धडक, सांगलीतील 6 महिला जखमी

Last Updated:

Accident in Sangli: सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे आज सकाळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

News18
News18
विशाल पाटील, प्रतिनिधी सांगली: सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे आज सकाळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील सहा महिला प्रवासी आणि बसचालक गंभीर जखमी झाले. सुदैवाने या अपघात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर येथील काही महिला गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत होत्या. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून ही बस योगेवाडीजवळ आली असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
advertisement
अपघातामध्ये बसचालक गंभीर जखमी झाला असून, सहा महिला प्रवाशांनाही मार लागला आहे. सर्व जखमींना तातडीने तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात, भरधाव कंटेनरची बसला धडक, सांगलीतील 6 महिला जखमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement