Sangli Crime : सांगलीच्या चेतन माळी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना सापडली तळहाताऐवढी चिठ्ठी! त्या दोघींना अटक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli Crime Chetan Mali Case : चेतन माळी याचा विवाह एका विवाहित असलेल्या एका तरुणीशी झाला होता. लग्नानंतर चेतन आणि त्याच्या कुटुंबीयांना सतत त्रास दिला जात होता.
Sangli Crime News : सांगली येथील साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षाच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी तरुणाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाचे नाव चेतन बाळासाहेब माळी असून, त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे एक वेगळं कारण असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
घटस्फोटासाठी चेतनला वारंवार धमक्या
चेतन माळी याचा विवाह एका विवाहित असलेल्या एका तरुणीशी झाला होता. लग्नानंतर चेतन आणि त्याच्या कुटुंबीयांना सतत त्रास दिला जात होता. चेतनची आई उमा बाळासाहेब माळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चेतनची सासू संगीता महेश कांबळे आणि तिची आई निर्मला वाळे या दोघी चेतनवर सतत दबाव आणत होत्या. त्यांच्या मागणीनुसार, चेतनच्या पत्नीने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीला घटस्फोट द्यावा यासाठी या दोघी चेतनला वारंवार धमक्या देत होत्या.
advertisement
ओढणीच्या साहाय्याने गळफास
या मानसिक त्रासाला कंटाळून चेतन माळीने 3 सप्टेंबर रोजी आपल्या खोलीत लाकडी तुळईला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक नोट लिहिली होती. चेतन माळीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले होते की, माझ्या आत्महत्येला सासू संगीता आणि तिची आई निर्मला याच कारणीभूत आहेत.
advertisement
आत्महत्येनंतर मला न्याय द्या
सासू आणि तिची मला प्रचंड मानसिक त्रास झाला असून, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. "आत्महत्येनंतर मला न्याय मिळावा," अशी अंतिम इच्छाही त्याने व्यक्त केली होती. या चिठ्ठीतील नोंदीच्या आधारावर संजयनगर पोलिसांनी तातडीने तपास करत सासू संगीता कांबळे आणि आजी निर्मला वाळे या दोघींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
December 14, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Crime : सांगलीच्या चेतन माळी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांना सापडली तळहाताऐवढी चिठ्ठी! त्या दोघींना अटक











