Sanjay Gaikwad : बनियन-लुंगीवर आले, कँटिन कर्मचाऱ्याला बदडलं, संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा

Last Updated:

Sanjay Gaikwad : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मागवलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत थेट कॅंटिनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

बनियन-लुंगीवर आले, कँटिन कर्मचाऱ्याला बदडलं, संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा
बनियन-लुंगीवर आले, कँटिन कर्मचाऱ्याला बदडलं, संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई: अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात थांबतात. तिथेच असलेल्या कॅंटिनमधून जेवणाची सोय केली जाते. मात्र काल रात्री, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मागवलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत थेट कॅंटिनमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.
संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास आहेस. काल रात्री त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र, जेवण आल्यावर डाळीला दुर्गंधी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांनी उलटी झाल्याची माहितीही दिली आहे. आमदार निवासातच अशा प्रकारचे निकृष्ट जेवण मिळत असल्याने संतप्त झालेल्या आमदार संजय गायकवाड यांनी बनियन आणि लुंगीवरच कँटिनमध्ये धडक दिली. त्यांनी कँटिन व्यवस्थापक आणि आचाऱ्याला याचा जाब विचारला.  कँटिनमधून मागवलेल्या डाळीला वास येत असल्याचे त्यांनी कँटिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. एका आमदाराला जर एवढं वाईट जेवण देत असाल तर सामान्य लोकांना काय खाऊ घालत असाल असा सवाल त्यांनी केला. यानंतर संतापलेल्या गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत मारहाण केली. आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला जोरदार ठोसेही लगावले. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने देखील कर्मचाऱ्याला मारहाण केली.
advertisement
आमदार निवासात रात्री झालेल्या या राड्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. नेहमीच आक्रमक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या गायकवाड यांनी यावेळी थेट हातचलावल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे गायकवाड यांचा संताप योग्य होता, पण मारहाण चुकीची असल्याचे काहींनी म्हटले आहे.
advertisement
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडल्याने याचे राजकीय पडसाद विधानभवनात उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची चिन्हं आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Gaikwad : बनियन-लुंगीवर आले, कँटिन कर्मचाऱ्याला बदडलं, संजय गायकवाडांचा आमदार निवासात राडा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement