Sanjay Raut : '...मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?', PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या आरोपावर राऊतांचा सवाल
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही. पण अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत,ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले आहेत. पण असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार का?
Sanjay Raut on Dhananjay Munde and Pm Narendra Modi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमापासून धनंजय मुंडे यांना दुर ठेवल्याचा आरोप होत आहे. यावर आता शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. मग धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही. पण अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत,ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले आहेत. पण असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते. मग त्यांना पण दूर ठेवणार का? अजित पवारांवर दोन दिवसांपूर्वी 70 हजार कोटीचा आरोप केला होता. अशोक चव्हाणावर आरोप करतात, मग मग धनंजय मुंडेवर अन्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
advertisement
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत हे काही करून फायदा नाही. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात आहेत, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार. आता चारित्र्य म्हणजे काय हे आम्हाला वर जाऊन धर्म राजाला विचारावे लागेल, भगवद गीता बघावी लागेल, श्रीकृष्णाने अर्जुनाला अशी कोणती चारित्र्याची व्याख्या सांगितली आहेत का बघावे लागेल, असे राऊत यांनी सांगितले.
advertisement
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत असतील तर स्वागत आहे. उद्योगपतीच्या विकासासाठी नाही.मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर, धारावीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली. आणि प्रधानमंत्री मणिपूरमध्ये कधी जाणार आहेत हा देखील प्रश्न आहे, दिल्ली निवडणुका झाल्या की त्यांनी जावे, असा सल्ला राऊतांनी मोदींना दिला.
advertisement
दरम्यान महायुतीच्या बैठकीत आज इव्हीएमचे मशिन ठेवले पाहिजे, महापुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ते मशीन ठेवावे, मग या विजयाचे शिल्पकार मंचावर येतील,असा टोला देखील राऊतांनी लगावला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : '...मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?', PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या आरोपावर राऊतांचा सवाल


