Santosh Deshmukh Case : पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही..., संतोष देशमुखांची लेक हत्येच्या तपासावर पहिल्यांदाच बोलली

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबिय सध्या राज्यभर आक्रोश मोर्चे काढतंय. आज धाराशीवमध्ये या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाआधी देशमुखांची लेक वैभवी देशमुखने न्यूज 18 लोकमतशी बातचित केली आहे.

santosh deshmukh murder
santosh deshmukh murder
Santosh Deshmukh Murder, Vaibhavi Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महिना उलटला आहे. मात्र अद्याप हत्येचा उलगडा होऊ शकला नाही. त्यामुळे दररोज न्यायासाठी आक्रोश मोर्चा काढणाऱ्या देशमुख कुटुंबियांनी आता तपासावर संशय उपस्थित केला आहे. पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही, तपास कसा सुरू आहे याची आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबिय सध्या राज्यभर आक्रोश मोर्चे काढतंय. आज धाराशीवमध्ये या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाआधी देशमुखांची लेक वैभवी देशमुखने न्यूज 18 लोकमतशी बातचित केली आहे. यावेळी वैभवी देशमुखने हत्येचा तपासावर संशय व्यक्त केला.
पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही, तपास कसा सुरू आहे याची आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिले त्या पद्धतीने तपासून आम्हाला माहिती द्यायला हवी. पण आमच्यापासून काहीतरी लपवत जात आहे, असा संशय वैभवी देशमुखने व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गुन्हा दाखल केला असला तर ती चांगलीच गोष्ट आहे पण त्याचाही तपास लवकर व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंबीयांच्या सदस्यांनी केली आहे. यावेळी बोलताना संतोष देशमुख यांच्या मुलीला पुन्हा अश्रू अनावर झाले होते.
advertisement
दरम्यान या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, संतोष देशमुख यांची मुलगी म्हणते सीआयडी ने माहिती दिली नाही, यावर कुटुंबाला माहिती दिली पाहिजे असे माझं ही म्हणणं आहे,पारदर्शक तपास होतोय तर माहिती द्यायला हवी, असे सामंत यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : पोलीस आम्हाला कुठलीच माहिती देत नाही..., संतोष देशमुखांची लेक हत्येच्या तपासावर पहिल्यांदाच बोलली
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement