Santosh Deshmukh Murder : धनंजय मुंडे, तुला सोडणार नाही,तुझं सगळंच..., पैठणमधून मनोज जरांगेंचा इशारा

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्याला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला.

santosh deshmukh murder case manoj jarange
santosh deshmukh murder case manoj jarange
Santosh Deshmukh Case, Manoj Jarange On Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव पुढे येत आहे. पण वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याच वाल्मिक कराडवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य करायला सूरूवात केली आहेत. त्यात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तु माझ्यावर हजार केसेस कर मी मागे हटणार नाही. माझ्या विरोधात शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर, तरी मी मागे हटत नाही. पण आता मी तुला सोडणार नाही, असा इशाराच दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्याला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केलं आहे. आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. धनंजय देशमुख यांना धनंजय मुंडे यांचें गुंड धमकी देत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
advertisement
तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसी आसरा घेतोयस. खून करणार तुम्ही पापं करणार आणि ओबीसी पांघरून घालणार, असा टोला जरांगेनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. धनंजय मुंडे तुमचे पाय खोलात जात आहे. तुम्ही तुमच्या लाभार्थी टोळीला सांगून आरोपीला साथ देत आहात. तुमच्या कुटुंबाला कोणी मारल तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का ?असाही सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला.
advertisement
आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. माझ्यावर हजार केसेस करा मागे हटणार नाही. माझ्या विरोधात शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर मी मागे हटत नाही. आता मी तुला सोडणार नाही. बीड पासून मुंबई पर्यंत सगळ काढतो. धनंजय मुंडे आता 25 नंतर कायदेशीर भेटू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
,असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Murder : धनंजय मुंडे, तुला सोडणार नाही,तुझं सगळंच..., पैठणमधून मनोज जरांगेंचा इशारा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement