Sarpanch Murder: संतोष देशमुखांना मारलं, बॉडी फेकली अन् चौकातून पोलिसांसमोरून आरोपी पळाले; पहिल्यांदाच VIDEO समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीस आणि आता हस्तगत केलेली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेत. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. राज्यभर या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. अखेर या प्रकरणातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर आळलाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी येथील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी येथील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. 9 डिसेंबर 2024 म्हणजे हत्येच्या दिवसाचा हा संध्याकाळच्या वेळचा हा व्हिडीओ आहे.
advertisement
ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या दिवशीचा व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या 18 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरी स्कार्पिओ सोडून रस्त्याने पळून जाताना दिसत आहेत.
Watch Video:
advertisement
आरोपी पोलिसांसमोर पळाले
या व्हिडीओमध्ये पाठीमागे पोलीस असताना देखील पोलिसांच्या समोर हे आरोपी पळून कसे गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्कार्पिओ रस्त्यावर सोडूनच हे सर्व आरोपी पळताना या व्हिडिओ दिसत आहेत. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली होती. याच काळ्या रंगाच्या गाडीतून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं.
advertisement
स्कार्पिओ पोलिसांच्या ताब्यात
संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीस आणि आता हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओ मधून या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली.त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. पुण्यामधून घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर जी स्कार्पिओ यामध्ये वापरण्यात आली ती स्कार्पिओ पोलिसांनी आता हस्तगत केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 8:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sarpanch Murder: संतोष देशमुखांना मारलं, बॉडी फेकली अन् चौकातून पोलिसांसमोरून आरोपी पळाले; पहिल्यांदाच VIDEO समोर