संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ समोर, गयावया करणारे देशमुख अन् आसुरी हसणारे मारेकरी पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
वाल्मिक कराडच्या गँगने कौर्याची परिसिमा गाठत संतोष देशमुख यांच्यावर केलेल्या क्रूर अत्याचाराचा व्हिडीओ पहिल्यांदाच कोर्टात समोर आला.
बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात झाली. या सुनावणीत सरकारी पक्षाने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या कशी केली, याचे पुरावे सादर केले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आले. या व्हिडिओमध्ये मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केल्याचेही दिसून आले. हे सर्व पाहून संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख यांनी हंबरडा फोडला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्येचे फोटोनो अवघा महाराष्ट्र हादरला होता. वाल्मिक कराडच्या गँगने कौर्याची परिसिमा गाठत संतोष देशमुख यांच्यावर क्रूर अत्याचार करण्यात आले होते. या फोटोमध्ये आरोपी सुदर्शन घुले आणि इतर सगळेच आरोपी या फोटोमध्ये दिसले होते. पहिल्यांदाच कोर्टात या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून या वेळी उपस्थितांच्या देखील मन सुन्न झाले.
advertisement
कोर्टात हत्येचा व्हिडीओ दाखवला
खंडणी प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती.या घटनेला ९ डिसेंबर रोजी वर्ष पूर्ण झाले. सध्या या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पहिल्यांदाच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
advertisement
बीडसह छत्रपती संभाजीनगर मध्ये काल दिवसभर सुनावणी पार पडली पुढच्या तारखेपर्यंत चार्ज फ्रेम होईल अशी अपेक्षा आहे. संभाजीनगर येथे कोर्टाला व्हिडिओ दाखवण्यात आले. कोर्ट ते पाहू शकलं नाही, आम्हाला देखील अश्रू अनावर झाले. आम्ही या दुःखातून बाहेर निघालेले नाहीत आणि कधी निघू शकणार नाही. एवढ्या निर्घृण पद्धतीने ही हत्या करण्यात आली. आरोपीचा समर्थन करणारी टोळी सक्रिय झाली असून त्या टोळीला वारंवार सोशल मीडियावर आरोपींची आठवण येत आहे. या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कारवाई करावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ समोर, गयावया करणारे देशमुख अन् आसुरी हसणारे मारेकरी पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला









