भाजपचा जिल्हाध्यक्ष बदलला, काँग्रेसनेही निर्णय घेतला, पृथ्वीराजबाबांनी नाव ठरवलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Satara Congress: विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सातारा जिल्ह्यात घरघर लागली असून अनेजण पक्षातून बाहेर पडले आहेत.
विशाल पाटील, सातारा : काँग्रेसचा सातारा जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्वागताला विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांची दांडी मारली होती. तर प्रदेश कार्यकारणीतील रणजितसिंह देशमुख यांच्या नावावर सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या निवडीनंतर आता काँग्रेसलाही नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रणजितसिंह देशमुख काँग्रेसचे माण-खटाव तालुक्यातील नेतृत्व असून पक्षांशी एकनिष्ठ आहे. कराडला प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताला लावलेल्या बॅनरवर विद्यमान जिल्हाध्यक्ष यांना डावलून रणजितसिंह देशमुख यांच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याचे समोर आले आहे.
जिल्हाध्यक्ष निष्क्रिय ठरतोय, त्यांना बदला, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची निवडणुकीनंतर मागणी
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सातारा जिल्ह्यात घरघर लागली असून अनेजण पक्षातून बाहेर पडले आहेत. काँग्रेस पक्षातून अनेकजण बाहेर पडत असताना जिल्हाध्यक्ष निष्क्रिय ठरत असल्याचे
advertisement
सांगून कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी करीत आहेत.
कराडला पृथ्वीराज चव्हाण-रणजितसिंह देशमुखांची चर्चा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रणजितसिंह देशमुख यांची काही दिवसापूर्वी कराडला बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपद रणजितसिंह देशमुख यांच्याकडे देण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे आता एका निष्ठावंत कार्यकर्त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
May 14, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचा जिल्हाध्यक्ष बदलला, काँग्रेसनेही निर्णय घेतला, पृथ्वीराजबाबांनी नाव ठरवलं?