साताऱ्याच्या लेकीचा मृत्यूशी संघर्ष पण पालकांना अमेरिकेचा व्हिसा मिळेना, मंत्र्यांचे उंबरठे झिजवले पण दाद मिळेना
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
विशाल पाटील सातारा : जिल्ह्यातील उंब्रज गावच्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला.. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.. मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिजा मिळत नाही
भारतातून परदेशात केवळ मौजमज्जा करण्यासाठी मंत्र्याच्या मुलाला विमान मिळत. मुलाला थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र, मरणाच्या दारात असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाही. साताऱ्यातील कराड तालुक्यातील असलेल्या उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाही.
advertisement
नीलमची प्रकृती गंभीर
नीलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामसाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र, रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगतायत. अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हाता, पायांना आणि दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तीची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
पालकांनी कोणी दाद देईना
सध्या निलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा ऑफिसला पालक गेले तरीही दाद मिळेना.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 25, 2025 8:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्याच्या लेकीचा मृत्यूशी संघर्ष पण पालकांना अमेरिकेचा व्हिसा मिळेना, मंत्र्यांचे उंबरठे झिजवले पण दाद मिळेना