VIDEO : कधी रस्त्यावर तर कधी कारच्या बोनेटवर, दारू पिऊन तरूणीचा रस्त्यावर धिंगाणा, साताऱ्यात धक्कादायक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कराड-पाटण राज्यमार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत मद्यपी युवतीने रस्त्यावर धिंगाना घातला. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
Satara News : कराड, सातारा प्रतिनिधी : कराड-पाटण राज्यमार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत मद्यपी युवतीने रस्त्यावर धिंगाना घातला. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. या घटनेने रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
advertisement
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-पाटण राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ असताना मंगळवारी रात्री एका मद्यपी युवतीने विजयनगर येथील एमएससीबी चौकात धिंगाना घालण्यास सुरूवात केली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवत त्या वाहनांच्या बोनेटवर बसून रस्त्यावरच अर्वाच्च भाषेत आरडा ओरडा सुरू होता. काही वाहनांवर दगडफेक केल्याचेही तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांकडून समजले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी कराड शहर ठाण्याचे पोलीस रवाना झाले आहेत.
advertisement
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
November 26, 2025 12:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : कधी रस्त्यावर तर कधी कारच्या बोनेटवर, दारू पिऊन तरूणीचा रस्त्यावर धिंगाणा, साताऱ्यात धक्कादायक घटना

