फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल, भाजप मंत्र्यांनी काय सांगितलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
फलटण प्रकरणात पोलिसांनी मयत तरुणीसह दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.
सातारा जिल्ह्याच्या फलटण येथे महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. संबंधित महिला डॉक्टरने हातावर सुसाईट नोट लिहून जीवन संपवलं होतं. या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं होतं. बदणे याने आपल्यावर चारवेळा लैंगिक अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असं तिने नोटमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या सगळ्या घडामोडीनंतर पोलिसांनी मयत तरुणीसह दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे. चॅटींगमध्ये सापडलेला संवाद सार्वजनिक करता येण्यासारखा नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्या तिघांमध्ये नक्की काय बोलणं झालंय? आणि तिघांमध्ये नक्की कनेक्शन काय आहे? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
जयकुमार गोरेंनी काय सांगितलं?
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले, "आम्ही त्या भगिनीचा आदर करतो. मात्र मोबाईल चॅटिंगवरून जो ट्रँगल समोर आला आहे, तो गंभीर असून लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये, असे सनसनाटी विधान करून गोरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
फलटण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आहेत. तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कधी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिचे नसल्याचे आरोप होतात. मग कुटुंबीय हे हस्ताक्षर तिचेच असल्याचं सांगतात. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील चॅटिंग बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. आपण मृत भगिनीचा आदर करतो आणि त्यामुळेच पोलीस ही वस्तुस्थिती समोर आणत नाहीत. मात्र याचा गैरफायदा घेत काही लोक घाणेरडे राजकारण करत आहेत, असेही गोरे म्हणाले.
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
November 01, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल, भाजप मंत्र्यांनी काय सांगितलं?


