वर्षाला ५ कोटी कमावतो, त्याला पिस्तूल विकायची गरज काय? सिकंदरच्या समर्थनार्थ साताऱ्यात पैलवान एकवटले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पैलवान सिकंदर शेखला या प्रकरणात गुर्जर गँगशी संबंध जोडून अडकवले जात असल्याचा आरोप साताऱ्यातील कुस्तीपटूंनी केला.
विशाल पाटील, सातारा, प्रतिनिधी: महाराष्ट्र केसरी आणि रुस्तुम ए हिंदकेसरी किताब मिळवणारा पैलवान सिकंदर शेख याला पंजाब येथे अवैध शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पैलवान सिकंदर शेखला या प्रकरणात गुर्जर गँगशी संबंध जोडून अडकवले जात आहे. सिंकदरवर अन्याय होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पैलवान संतोष वेताळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. साताऱ्यात सिकंदरच्या समर्थनार्थ पैलवानांनी पत्रकार परिषद घेतली.
पैलवान संतोष वेताळ म्हणाले, हिंदकेसरी पैलवान मारुती माने आणि पैलवान गणपतराव आंदळकर यांच्यानंतर उत्तर भारतातील पैलवानांच्या छाताडावर बसण्याचे काम केवळ सिकंदर शेख यांनी केल्यामुळे त्याला अडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिकंदर शेख याला वर्षाला किमान ४ ते ५ कोटी रुपये मिळतात. तेव्हा तो असे कृत्य का करेल? असाही सवाल संतोष वेताळ यांनी उपस्थित केला.
advertisement
सिकंदर शेख प्रसिद्ध पैलवान, त्याच्यावर ट्रॅप लावल्याचा संशय- पैलवान संतोष वेताळ
एका कुस्तीला तीन ते चार लाख मिळतात तर वर्षभरात चार ते पाच कोटी रुपये कमावणाऱ्या सिकंदर शेखला पिस्तूल विकायची काय गरज आहे? गेल्या चार दिवसात त्याचे अठरा लाख रुपये कुस्ती न खेळल्याने बुडाले आहेत. तेव्हा असे किती पिस्तूल विकून त्याला पैसे मिळणार होते? असे पैलवान संतोष वेताळ म्हणाले.
advertisement
पोलिसांची कारवाई, कुटुंबियांनी आरोप फेटाळले
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सिकंदरच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळून लावले असून सिंकदर निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
advertisement
देशातला नावाजलेला मल्ल, सिकंदर शेख याची ओळख
अतिशय गरिबीतून वरती आलेला सिकंदर शेख हा नावाजलेला मल्ल म्हणून गणला जाऊ लागला. देशभरातील मानाच्या कुस्त्यांच्या मैदानात मोठमोठ्या मल्लांना चितपट करत सिंकदरने नाव कमावले. २०२४ साली त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. पाठोपाठ रुस्तम ए हिंद केसरीची गदाही त्याने उंचावली. अल्पावधीत सिकंदर शेख कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत झाला.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
November 01, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वर्षाला ५ कोटी कमावतो, त्याला पिस्तूल विकायची गरज काय? सिकंदरच्या समर्थनार्थ साताऱ्यात पैलवान एकवटले


