'इथं' 35 रुपयांत मिळते पोटभर पुरी भाजी, तरी व्यावसायिकाची कमाई लाखोंची!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतं. याच व्यवसायातून आज त्यांनी एक आलिशान टू बीएचके फ्लॅट आणि गाडी खरेदी केलीये.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : व्यवसाय म्हणजे रिस्क, पण जर त्यासाठी मनापासून कष्ट केले, जरा संयम बाळगला आणि नशिबाचीही साथ मिळाली तर होतो फायदाच फायदा. परंतु त्यासाठी मेहनत करायची पूर्ण तयारी असायला हवी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी निकम.
सातारच्या ग्रामीण भागातले हे रहिवासी. 1995 साली त्यांनी सातारच्या राजवाडा चौपाटीवर पुरी भाजीचा व्यवसाय सुरू केला. 5 रुपये प्लेटपासून सुरूवात केली होती, आज ते 35 रुपये प्लेट किंमतीनं पुरी भाजी विकतात. दिवसाला 100 ते दीडशे प्लेट पुरी भाजीची विक्री होते. त्यातून महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतं. याच व्यवसायातून आज त्यांनी एक आलिशान टू बीएचके फ्लॅट आणि गाडी खरेदी केलीये, शिवाय मुलांना उत्तम शिक्षण दिलंय.
advertisement
विशेष म्हणजे लहान व्यवसाय आहे असं समजून ते खचले नाहीत किंवा तो बंद पडू दिला नाही. तर, संयम आणि प्रामाणिकपणा बाळगून आज वर्षाला ते या व्यवसायातून लाखो रुपये कमवतात. इथं ग्रामीण भागासह, शहरातूनही खवय्ये पुरी भाजी खायला येतात. शिवाय पर्यटक थांबून थांबून पुरी भाजीचा आस्वाद घेतात.
advertisement
बरं, स्वतःचा व्यवसाय म्हणून कधीही काम करायचं, कधीही सुट्टी घ्यायची असं नाहीये, तर दररोज न चूकता पहाटे 3 वाजता त्यांचं काम सुरू होतं. मग राजवाडा चौपाटीला पुरी भाजी खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसते. इथं कॉलेजच्या तरुणांसह वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील खवय्ये आवडीनं येतात. शिवाजी निकम आणि त्यांच्या पत्नीला ग्राहक आपुलकीनं काका-काकू अशी साद घालतात. पुरी भाजीच्या प्लेटमध्ये 6 पुऱ्या, 1 खुसखुशीत पापड, कांदा, लिंबू आणि भाजी मिळते. त्यामुळे ही पुरी भाजी खाल्ल्यावर मन अगदी तृप्त होतं.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 05, 2024 4:30 PM IST