नवऱ्याच्या निधनानंतर गृहिणी झाली व्यावसायिक; आज तिच्या हातची चव मुंबईभर प्रसिद्ध
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सगळीकडे सर्व पदार्थ मिळत असले तरी विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट पदार्थांना खास मागणी असते. तिथल्या चवीला खवय्यांची पसंती मिळते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : वडापाव, मिसळ पाव, उसळ हे पदार्थ मुंबईकरांच्या आवडीचे. खरंतर ऐन वेळेस पोट भरणारे हे पदार्थ मुंबईकरांना धावपळीत साथ देतात. परंतु सगळीकडे सर्व पदार्थ मिळत असले तरी विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट पदार्थांना खास मागणी असते. तिथल्या चवीला खवय्यांची पसंती मिळते. माटुंग्यातही एक स्नॅक कॉर्नर प्रचंड फेमस आहे.
इथं गेली 20 वर्षे वृषाली सावंत या वडापाव, उसळ, मिसळ पाव, कांदा भजी, इत्यादी विविध पदार्थांची विक्री करतात. त्यांच्या दुकानाचं नाव आहे 'स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर'. या दुकानात अगदी परवडणाऱ्या किंमतीत स्वादिष्ट पदार्थ मिळतात. इथली मिसळ तर लोकप्रिय झालीये. ती मिळते फक्त 40 रुपयांना. खरंतर हे दुकान मिसळ आणि उसळसाठीच प्रसिद्ध आहे.
advertisement
घरगुती चटणी आणि घरची चव यासाठी इथं खवय्यांची गर्दी होते. ग्राहक इथल्या चटणीचं विशेष कौतुक करतात. वृषाली सावंत या आधी गृहिणी होत्या. परंतु नवऱ्याच्या निधनानंतर त्या आई-वडिलांसोबत राहू लागल्या. त्यांना मदत म्हणूनच त्या हे दुकान चालवतात. हळूहळू इथले पदार्थ लोकांना आवडू लागले आणि दुकान प्रसिद्ध झालं. मग त्यांनी हार न मानता हे काम सुरूच ठेवलं.
advertisement
'मी गेली 20 वर्षे हे स्नॅक्स कॉर्नर माझ्या आई-वडिलांसोबत चालवते. यात सगळ्यात मोठा वाटा हा माझ्या आई-वडिलांचा आणि मुलाचा आहे. आमच्या दुकानात मिळणारी चटणी ही आम्ही घरीच बनवतो, त्यामुळे ती सर्वांना आवडते. आमच्याकडे मिळणारी मिसळसुद्धा प्रसिद्ध आहे', असं स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नरच्या दुकानदार वृषाली सावंत यांनी सांगितलं.
तुम्हीसुद्धा मिसळ, उसळ, भजी, वडापाव आणि त्यासोबत अप्रतिम अशा चटणीचा आस्वाद घेऊ शकता. माटुंगा स्टेशनजवळच हे स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2024 10:08 AM IST