Loksabha : माझं कुरिअर लांब पाठवायचं तुमच्या डोक्यात पण...; उदयनराजेंनी तिकीटाच्या प्रश्नावर दिली प्रतिक्रिया

Last Updated:

साताऱ्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. भाजप पक्षाचा ध्वज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फडकवण्यात आला.

News18
News18
सचिन जाधव, सातारा :  साताऱ्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले  हे उपस्थित होते. भाजप पक्षाचा ध्वज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फडकवण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  भाजपाचा एक काळ असा होता की भाजपाचे दोनच खासदार होते मात्र आता देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपाची ओळख झाली असल्याचं ते म्हणाले.
भाजपमध्ये  कोणताही भेदभाव केला जात नाही. या पक्षात वशिल्याची गरज लागत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या पक्षात केलं जातं. यामुळंच पक्षावर विश्वास लोकांच्या मनात निर्माण झालाय. बाकीच्या पक्षांची आयडीयालाॅजी चुकिची आहे असं मी म्हणणार नाही. मात्र सर्वसामान्यांना पक्षात न्याय दिला गेला असता तर ते पक्ष सुद्धा मोठे झाले असते असंही उदयनराजे यांनी म्हटलं.
advertisement
सातारा लोकसभा मतदारसंघात अद्याप भाजपने तिकीट जाहीर केलेलं नाही. उदयनराजेंनी दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीही घेतल्या. मात्र अजून घोषणा न झाल्याने तिकीट कधी मिळणार असं उदयनराजेंना विचारण्यात आलं. ते म्हणाले की, फिरून फिरून सारखा तोच विषय असतोय. कसलं तिकिट पाहिजे? तुमच्यावर शंका येते की, कुरिअर असतं ना, तसं यांना पॅक करायचं आणि तिकीट लावून लांब पाठवायचं असं तुमच्या डोक्यात आहे. पण एवढं सोपं नाही. सातारा या जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या. जिल्ह्यानं महाराष्ट्राला, देशाला दिशा देण्याचं काम केलंय. साताऱ्यावर बोट ठेवलं‌ की बाकीच्या तडजोडी होत राहतात म्हणुन साताऱ्याची आगळी वेगळी ओळख आहे.
advertisement
शरद पवार यांच्या सोबत बोलणं झालय का? असं विचारलं असता उदयनराजे म्हणाले की, माझी पक्षापेक्षा तत्वावर निष्ठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव अनेक पक्षांनी घेतलंय. मात्र त्यांचे विचार भाजपानं आचरणात आणले. आणि तुतारी म्हणजे काय? हे चिन्ह कोणीतरी घेतलंय. पुर्वीपासून कोणत्याही लग्नात गेलो तरी तुतारी असतेच. आमच्या वाड्यात सुद्धा तुतारी असायची. चिन्ह चांगल आहे. हे खरं असलं तरी मला दुसऱ्या पक्षावर भाष्य करायचं नाही. पक्ष वाढवण्यासाठी त्या पक्षांतील श्रेष्ठींनी त्यांचे प्रयत्न करावेत असा सल्लावजा टोमणाही उदयनराजे यांनी मारला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Loksabha : माझं कुरिअर लांब पाठवायचं तुमच्या डोक्यात पण...; उदयनराजेंनी तिकीटाच्या प्रश्नावर दिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement