Phaltan Doctar Case : 'अपेक्षा कोणाकडून ठेवायची?', सातारा महिला डॉक्टर प्रकरणावर राहुल गांधींचा सनसनाटी आरोप! 'ही तर संस्थात्मक हत्या...'

Last Updated:

Rahul Gandhi On Phaltan Women Doctor Death : इतरांचं दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका हुशार डॉक्टरला भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी पडला, असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi On Phaltan Women Doctor Death
Rahul Gandhi On Phaltan Women Doctor Death
Rahul Gandhi On Satara Doctor Case : साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरने स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यात पीएसआयचं नाव समोर आल्याने आता मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता या प्रकरणाने देशात खळबळ उडवली असून राहुल गांधी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

महाराष्ट्रातील सातारा येथे छळ सहन केल्यानंतर महिला डॉक्टर यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी एक शोकांतिका आहे. इतरांचं दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका हुशार डॉक्टरला भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी पडला, असं राहुल गांधी म्हणाले.

आत्महत्या नाही, संस्थात्मक हत्या - राहुल गांधी

advertisement
गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. बलात्कार आणि शोषण. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे, ही आत्महत्या नाही. ही संस्थात्मक हत्या आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
advertisement

पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे आम्ही उभा - राहुल गांधी

जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? महिला डॉक्टर यांच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
advertisement

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

दरम्यान, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Phaltan Doctar Case : 'अपेक्षा कोणाकडून ठेवायची?', सातारा महिला डॉक्टर प्रकरणावर राहुल गांधींचा सनसनाटी आरोप! 'ही तर संस्थात्मक हत्या...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement