Udayanraje Bhosale: राजवाडा, अलिशान गाड्या, जमीनजुमला; उदयनराजेंची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Udayanraje Bhosale: सातारा गादीचे वारसदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती अखेर समोर आली आहे. त्यांनी आज आपला सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामध्ये, उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती कोटींत नाही तर अब्जावधी रुपयांची असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे.
उदयनराजे व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. दरम्यान, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
साताऱ्यात चुरस
शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवणं ही शरद पवारांची ही वेगळी चाल असल्याचं बोललं जातंय. पवारांनी अनेक गणितं आखुन शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात आहे, ही त्यांच्या जमेची बाजु आहे. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात जावुन राष्ट्रवादी मजबुत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळं प्रत्येक तालुक्यात शशिकांत शिंदे यांना ओळखणारी लोकं आहेत. तसंच शशिकांत शिंदे हा संयमी चेहरा असुन शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातील सुद्धा आहेत. या बाजू खुप जमेच्या असुन उदयनराजे भोसले यांच्यासोबत लढण्यासाठी महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसातील एका सभेने निवडणूक फिलवली असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. येथून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील निवडून आले होते. या जागेवर आता शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपतर्फे पुन्हा एकदा उदयनराजे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 18, 2024 9:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Udayanraje Bhosale: राजवाडा, अलिशान गाड्या, जमीनजुमला; उदयनराजेंची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील