पूजा खेडकरसारखी आणखी दोनं प्रकरण, खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल !
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पूजा खेडकर प्रकरणानंतर आता सातारा आणि सांगलीतील उपजिल्हाधिकाऱ्यांनी एमपीएससीला गंडवलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे....
सातारा: वादादीत आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने अपडेट समोर येत आहेत. पूजा खेडकरांवर आता युपीएससीने देखील गुन्हा दाखल केला आहे. असं असताना आता सातारा आणि सांगलीमध्ये दोन उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील एमपीएससीची फसवणूक केली आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे...दरम्यान समोर येत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेणार आहेत.
नेमकं काय प्रकरण?
हे प्रकरण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे. दिव्यांग असल्याचं सांगत माधुरी कल्याण नष्टे आणि अजय कल्याण नष्टे या दोन अधिकाऱ्यांनी एमपीएससीला गंडवलं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हे दोघेही उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. माधुरी नष्टे सातारा येथे उपजिल्हाधिकारी तर अजय नष्टे सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की, या दोघांनीही 80 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. हे प्रमाणपत्र बोगस असून, या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवण्याचा वडेट्टीवार यांचा दावा आहे.
advertisement
कारवाईची मागणी:
या दोघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कारवाईची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. दरम्यान, आता दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे.
advertisement
खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती:
वादादीत आयएएस अधिकारी पूजा खेडकरने देखील असाचा काहिसा प्रकार केला आहे. आता युपीएससीने देखील पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला आहे. खेडकर कुटुंबीयांनी बरीचशी माया जमवल्याचं देखील तपासातून समोर आलं होतं. आता सांगली आणि साताऱ्यातील या नष्टे प्रकरणात नेमकं काय समोर येतंय, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
July 20, 2024 3:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पूजा खेडकरसारखी आणखी दोनं प्रकरण, खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल !


