advertisement

Satish wagh Murder Case : 15 मिनिटांत सपासप 72 वार, हत्येपूर्वी जादूटोण्याचा प्रयोग, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड!

Last Updated:

Satish wagh Murder Case Update : सतीश देशमुख प्रकरणात पत्नी आणि प्रियकराने हत्या करण्यापूर्वी जादूटोण्याचा प्रयोग केल्याच तपासात उघड झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.

black magic Satish wagh Murder Case
black magic Satish wagh Murder Case
Satish wagh Murder Case : विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांची हत्या त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्यातं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 48 वर्षीय मोहिनी वाघ यांना 25 डिसेंबर रोजी अटक केली होती. अशातच आता आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

हत्या करण्यापूर्वी जादूटोण्याचा प्रयोग

सतीश वाघ यांचं मांजरी परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर तब्बल 14 तासानंतर उरूळी कांचनच्या घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता. हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना 72 वेळा चाकूने भोसकलं, तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला होता. तसेच हत्येपूर्वी आरोपींनी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचं देखील समोर आलंय. पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. पत्नी आणि प्रियकराने हत्या करण्यापूर्वी जादूटोण्याचा प्रयोग केल्याच तपासात उघड झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
advertisement

विवाहबाह्य संबंध

सतीश वाघ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर याच्याशी सतीश वाघ यांच्या पत्नीशी असलेले विवाहबाह्य संबंध हे या हत्येमागंचं प्रमुख कारण आहे, अशी माहिती देखील समोर आली होती. माझा पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, असा आरोप सतीश वाघ यांच्या पत्नीने केला होता.
advertisement

9 डिसेंबरला नेमकं काय झालं होतं?

दरम्यान, 9 डिसेंबरला सतीश वाघ यांनी शेवाळवाडीतून मॉर्निंग वॉकला सुरूवात केली. यानंतर हॉटेल ब्लू बेरीजवळ सतीश वाघ थांबले, तेव्हा कारमधून चौघेजण उतरले आणि त्यांनी सतीश वाघ यांचं कारमध्ये डांबून अपहरण केलं. या चौघांनी सोलापूर मार्गाच्या दिशेने कार पुढे नेली. यानंतर 9 डिसेंबरच्याच संध्याकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satish wagh Murder Case : 15 मिनिटांत सपासप 72 वार, हत्येपूर्वी जादूटोण्याचा प्रयोग, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement