SBI SCO Bharti 2025: बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, विना परीक्षा State Bank Of India मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?

Last Updated:

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी 996 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी 02 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

SBI SCO Bharti 2025: बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, विना परीक्षा State Bank Of India मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
SBI SCO Bharti 2025: बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, विना परीक्षा State Bank Of India मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात आहात, तर ही बातमी तुमच्या साठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer- SCO) पदासाठी 996 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी 02 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जर तुम्हीही या नोकर भरतीसाठी पात्र असाल तर अर्ज करू शकणार आहेत. भरतीमध्ये विविध पदांसाठी समावेश आहे आणि वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. रिक्त पदांसाठीच्या पात्रता आणि निकष जाणून घेऊया...
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 02 डिसेंबर 2025 पासून सुरूवात झाली आहे. या अर्ज प्रक्रियेचा शेवटचा दिवस 23 डिसेंबर 2025 असणार आहे. बँकेकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकष आणि सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणजेच, विशेषज्ञ अधिकारी पदासाठी मर्यादित काळासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1 मे 2025 रोजी पर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 42 वर्षे आहे. कोणकोणत्या पदासाठी किती किती जागा आहेत, याचा सुद्धा आढावा घेऊया.
advertisement
जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीमध्ये तीन पदांसाठी 996 जागा रिक्त आहेत. यामध्ये, VP वेल्थ (SRM) पदासाठी 506 रिक्त जागा, AVP वेल्थ (RM) पदासाठी 206 रिक्त जागा आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव पदासाठी 284 रिक्त जागा आहेत. VP वेल्थ (SRM) पदासाठी 26 ते 42 वर्षे वयाची अट आहे. AVP वेल्थ (RM) पदासाठी 23 ते 35 वर्षे वयाची अट आहे. तर, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव पदासाठी 20 ते 35 वर्षे वयाची अट आहे. अशा विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. ऑनलाईन अर्जाची आणि ऑनलाईन पेमेंट करण्याचा अखेरचा दिवस एकच असणार आहे. अर्जदारांना दोन्हीही एकत्रच भरावे लागणार आहे.
advertisement
अधिकृत जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/1sTOeDMMmpJRLwaGyUf9wDlCPEnvHQl63/view
अधिकृत वेबसाईट - https://sbi.bank.in/
सर्व अधिकृत लिंक अर्जदारांना बातमीमध्ये देण्यात आली आहे. खुला प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक या श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्ती या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यांना कोणतेही अर्ज शुल्क भरायचे नाहीत. एसबीआय भरती वेबसाइटवर नियुक्त केलेल्या पेमेंट गेटवेचा वापर करून अर्ज शुल्क ऑनलाइन भरता येईल. उमेदवारांची निवड प्रक्रिया अनेक टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग, मुलाखत चाचण्या, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश आहे. सर्व टप्प्यात यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचाच अंतिम नियुक्तीसाठी विचार केला जाईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SBI SCO Bharti 2025: बँकेमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, विना परीक्षा State Bank Of India मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement