SBI Recruitment: SBI मध्ये मिळणार परीक्षेशिवाय नोकरी, घसघशीत मिळणार पगार; लवकर अर्ज करा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर रेग्युलर बेस’च्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 08 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे.
भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर रेग्युलर बेस’च्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 08 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 3 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतामध्ये पार पडणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या युवकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर’पदासाठी रेग्युलर बेस पदांवर भरती सुरू आहे. ही भरती 08 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 28 ऑक्टोबरपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 आहे. sbi.bank.in या वेबसाईटवर जाऊन अर्जदार अर्ज करू शकता. अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बँकेत डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 3 पदांसाठी भरती केली जाणार असून MMGS-II ग्रेडसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर’ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांपर्यंतची आहे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्ट लिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरीसाठी तुम्हाला 64,820 ते 93,960 रुपये पगार मिळणार आहे. बँकेतल्या ह्या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्राची मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याच सोबत इकोनॉमिमेट्रिक्स/ मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स/ फायनान्शियल इकोनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
October 12, 2025 3:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SBI Recruitment: SBI मध्ये मिळणार परीक्षेशिवाय नोकरी, घसघशीत मिळणार पगार; लवकर अर्ज करा