SBIमध्ये या पदाची अंतिम तारीख वाढवली,घसघशीत मिळणार पगार; लवकर अर्ज करा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
SBI SO Bharti: स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नोकरभरती आहे. एसबीआय बँकेमध्ये पुन्हा एकदा 'स्पेशलिस्ट ऑफिसर' पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. 122 पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.
फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करू पाहणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नोकरभरती आहे. एसबीआय बँकेमध्ये पुन्हा एकदा 'स्पेशलिस्ट ऑफिसर' पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. 122 पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. बँकेने या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून 15 ऑक्टोबर 2025 केली आहे. ज्या उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करू शकणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेचा भाग बनू शकतात.
122 पदांसाठी केली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. प्रत्येक अर्जदार एकावेळी फक्त एकाच राज्यासाठी एकदाच अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून शुल्क करण्याची प्रक्रियाही ऑनलाईनच असणार आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2025 आहे. प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म मॅनेजर, प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म डेप्युटी मॅनेजर आणि क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी भरती होत आहे. परंतु, प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म मॅनेजर आणि प्रोडक्ट्स डिजीटल प्लेटफॉर्म डेप्युटी मॅनेजर या दोन पदांची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर होऊन गेलेली आहे. आता सध्या क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी भरती होत आहे.
advertisement
क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी 63 पदांची भरती केली जाणार आहे. क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीची आवश्यकता आहे. MBA (Finance)/ PGDBA / PGDBM / MMS (Finance)/ CA / CFA / ICWA या पदव्यांची आवश्यकता आहे. तर संबंधित क्षेत्रामध्ये किमान 3 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 25 असून जास्तीत 35 वर्षे इतकी आहे. तिनही पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. शिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी वयामध्ये 5 वर्षांची सूट आहे. तर इतर मागासवर्गासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
advertisement
खुल्या प्रवर्गातील उमेदवार, इतर मागास वर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल आणि उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊनच अर्ज करावा लागेल. क्रेडिट ॲनालिस्ट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. वेतनासंबंधित बोलायचे तर, वेतन संरचनेमुळे ही भरती आणखी खास होते. ज्या स्पेशालिस्ट ऑफिसर्सची निवड होते, त्यांना दरमहा 85,920 ते 1,05,280 रुपये इतके वेतन मिळेल. याशिवाय, बँकेच्या वतीने इतर भत्ते आणि सुविधाही दिल्या जातील, ज्यामुळे हे पॅकेज आणखी आकर्षक होईल.
advertisement
भरती प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीच्या आधारावर होईल. एसबीआयकडून 100 गुणांची मुलाखत आयोजित केली जाईल आणि त्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठीची भरती लेखी परीक्षेच्या माध्यमातून नाही तर, केवळ मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचं एसबीआय बँकेत काम करण्याचं स्वप्न हे तुम्ही मुलाखत कशी देता? यातूनच भविष्य ठरणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 07, 2025 5:46 PM IST