बाप्पा...! निरोप देताना धाय मोकलून रडली चिमुकली, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

Last Updated:

शहापूरच्या साने गावातील श्राव्या प्रमोद पाटील हिने गौरी-गणपतीला निरोप देताना भावूक रडले, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भक्तीची प्रशंसा झाली.

News18
News18
सुनील घरत, प्रतिनिधी शहापूर: गणेशोत्सव हा अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण, वर्षभर बाप्पाच्या आगमनाची वाट पाहात असतात. घराघरांतील लहान मुलांच्या निरागस आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. बाप्पा घरी येणार इथपासून ते बाप्पा जाईपर्यंत लहान मुलांसाठी तो एक सोहळाच असतो. बाप्पाला निरोप देताना या लहान मुलांच्या डोळ्यात फक्त पाणी येत नाही तर आपलं कुणीतरी कायमचं दूर जातंय अशी भावना असते.
शहापूरमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकलीनं चक्क हंबरडा फोडला. गौरी-गणपती विसर्जनाच्या वेळी एका चिमुकलीने बाप्पाला निरोप देताना चिमुकली जोरजोरात रडायला लागली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.
advertisement
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ शहापूर तालुक्यातील साने गावातील श्राव्या प्रमोद पाटील या लहान मुलीचा आहे. श्राव्याच्या घरी सात दिवसांचा गौरी-गणपती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. या काळात तिने गणरायाच्या सजावटीपासून ते पूजे-आरतीपर्यंत सर्व कामांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पण जेव्हा विसर्जनाचा दिवस उजाडला, तेव्हा तिच्या निरागस मनाला बाप्पाचा निरोप घेणे सहन झाले नाही.
advertisement
जसजसे बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाण्याची वेळ आली, तसतशी श्राव्या धायमोकलून रडू लागली. तिचे रडणे पाहून कुटुंबीयांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची समजूत काढली आणि "पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार," असे आश्वासन दिले. त्यानंतरच तिचे रडणे थांबले.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत आहे. नेटकऱ्यांनी या चिमुकलीच्या निरागस भक्तीची आणि तिच्या बाप्पावरील निस्सीम प्रेमाची भरभरून प्रशंसा केली आहे. हा क्षण गणेशोत्सवाचा खरा अर्थ दाखवतो, जिथे भक्ती आणि भावनांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाप्पा...! निरोप देताना धाय मोकलून रडली चिमुकली, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी