Sangli : शाळगाव MIDCमध्ये गॅस लीकमुळे भीषण दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू
- Published by:Suraj
Last Updated:
सांगलीत शाळगाव एमआयडीसीत म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
विशाल पाटील, प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडलीय. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय तर ७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वायूगळतीनंतर 9 लोक अत्यवस्थ झाले होते. यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आले असून यामधील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुचिता उथळे (वय ५०) येतगाव, तर नीलम रेठरेकर (वय २६) मसूर अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
म्यानमार केमिकल कंपनी शाळगाव एमआयडीसी मध्ये वायू गळती झाल्याने 9 लोक अत्यवस्थ झाले होते. या सर्वांना तातडीने कराड सह्याद्री व श्री हॉस्पिटल मधे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व टेक्निकल बाबीवर चर्चा केली. पुढील धोका टळलेला असल्याची माहिती देण्यात आली. ही वायुगळती नेमकी कशामुळे झाली याबाबत सविस्तर माहिती समजू शकली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 11:06 AM IST


