शांतीवनवर मुसळधार पावसाचा कहर; संस्थेची शेती उद्ध्वस्त, 350 अनाथ लेकरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर, आता तुमच्या मदतीची गरज

Last Updated:

शिरूर कासारमधील शांतीवन संस्थेची शेती सिंधफणा नदीच्या पुरामुळे उद्ध्वस्त झाली असून ३५० अनाथ मुलांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

News18
News18
बीड : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील शांतीवन संस्थेवर प्रचंड आपत्ती कोसळली आहे. सिंधफणा नदीने अचानक प्रवाह बदलून थेट शांतीवनच्या शेतातून मार्ग काढला. त्यामुळे संस्थेची भरभराटीला आलेली शेती पूर्णपणे वाहून गेली. ऊस, कापूस, भाजीपाला, फळझाडं अशा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विहिरी गाळाने बुजल्या, ट्रान्सफॉर्मर, पाईपलाईन, मोटारी आणि शेतीची साधनं पाण्यासोबत वाहून गेली. परिसरातील मोठमोठी झाडंदेखील कोसळली आहेत.
advertisement
शांतीवन ही संस्था ३५० अनाथ, वंचित आणि उपेक्षित मुलांचं पालनपोषण करते. या संस्थेच्या स्वतःच्या शेतीतून संस्थेसाठी लागणाऱ्या अन्नधान्याचा जवळपास ५० टक्के पुरवठा केला जात असे. धान्य, भाजीपाला, दूध आणि किराणा यासाठी लागणाऱ्या गरजांचा मोठा भाग याच शेतातून भागवला जात होता. आता ही शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे लेकरांच्या पोटाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
advertisement
शांतीवनच्या माहितीनुसार, संस्थेला दर महिन्याला ३ ते ४ लाख रुपये, तर वर्षाला ४० ते ५० लाख रुपये अन्नधान्य व किराण्यासाठी लागतात. परंतु पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे हा प्रचंड खर्च पेलणे कठीण झाले आहे. शांतीवनचे अध्यक्ष श्री. सुरेश जोशी यांनी सांगितले की, “उध्वस्त झालेलं शेत बघायलासुद्धा मन धजावत नाही. वाहून गेलेलं पीक, खोल घळे आणि नष्ट झालेली साधनं पाहून डोळ्यांत पाणी येतं. पण या अंधारात एकच दिलासा आहे समाजाची साथ.”
advertisement
या संकटाच्या काळात शांतीवनने समाजाकडे मदतीसाठी हात पुढे केला आहे. संस्थेने विविध स्वरूपात योगदान देण्याचे पर्याय जाहीर केले आहेत. एका मुलाचं वार्षिक पालकत्व घेण्यासाठी २५,०००, दिवसभराचं पालकत्व १०,०००, एकवेळचं जेवण ५,०००, नाश्ता किंवा सायंकाळची फळं प्रत्येकी २,०००, लहान बाळांसाठी दूध १,००० किंवा सहयोग निधी म्हणून किमान ५०० इतके देणगी पर्याय उपलब्ध आहेत. तसेच मासिक किराणा किंवा छोट्या बाळांच्या दुधासाठीही मदत करता येईल.
advertisement
प्रत्येक देणगीवर 80G नुसार करसवलत मिळणार असून पावती दिली जाईल. देणगी Razorpay लिंकद्वारे किंवा थेट बँक खात्यावरही देता येईल.
देणगीसाठी तपशील :
Donation Link : https://pages.razorpay.com/Donateshantiwan
SBI खाते क्रमांक : 33446000963 (IFSC : SBIN0005995)
Axis Bank खाते क्रमांक : 919010006330040 (IFSC : UTIB0001090)
advertisement
नाव : Bhavani Vidyarthi Kalyan Pratishthan
अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे (मो. 9923772694 / 7028372694) यांच्याशी संपर्क साधता येईल. संस्थेचा पत्ता : शांतीवन, पोस्ट आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड ४३४९३२.
शांतीवनने समाजातील सर्वांना आवाहन केले आहे की- या संकटाच्या काळात दिलेला छोटासा हातही लेकरांच्या पोटाला भाकर देईल, त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशा निर्माण करेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हरवलेलं हास्य फुलवेल.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शांतीवनवर मुसळधार पावसाचा कहर; संस्थेची शेती उद्ध्वस्त, 350 अनाथ लेकरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर, आता तुमच्या मदतीची गरज
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement