आधी पुतण्याने केला गेम आता फडणवीसांचा मोठा डाव, थेट पवारांच्या आमदाराचा पुत्र भाजपच्या गळाला

Last Updated:

भाजपमध्ये होणाऱ्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

News18
News18
सांगली : ठाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २४ तासाच्या आत  सांगलीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात शरद लाड यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता 

शरद लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचा सांगली जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव आहे. ते क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांचे नातू आहेत. त्यामुळे लाड घराण्याचा वारसा असलेल्या राजकीय परंपरेला आता भाजपची जोड मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
advertisement
भाजपमध्ये होणाऱ्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यात पाटील गटाचे मोठे वर्चस्व असून, गेल्या अनेक निवडणुकांत त्यांनी स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र लाड घराण्यातील शरद लाड यांनी भाजपकडे झुकते माप दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटात चिंता वाढली आहे.
advertisement

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा डाव

लाड घराणे हे पवार गटाचे निष्ठावान समजले जात होते. आमदार अरुण लाड हे सध्या शरद पवार गटाचे आमदार असून, त्यांचा मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सांगली जिल्ह्यात भाजप आपला पाया मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल, असा अंदाज  व्यक्त करण्यात येत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेली ही चाल महत्त्वाची ठरणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मात्र हा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी पुतण्याने केला गेम आता फडणवीसांचा मोठा डाव, थेट पवारांच्या आमदाराचा पुत्र भाजपच्या गळाला
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement