Sharad Pawar NCP : मराठा-ओबीसी आरक्षण वादावर पवारांची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं...

Last Updated:

Maratha Reservation vs OBC Reservation : ओबीसींमधून मराठा आरक्षण देण्याबाबतच्या भूमिकेवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मराठा-ओबीसी आरक्षण वादावर पवारांची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं...
मराठा-ओबीसी आरक्षण वादावर पवारांची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं...
नाशिक: ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्य मान्य करत शासन आदेश जारी केले. त्यानंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ओबीसींमधून मराठा आरक्षण देण्याबाबतच्या भूमिकेवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मराठा-ओबीसींमध्ये भांडणं लावण्यात सरकार यशस्वी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
आव्हाड म्हणाले, “ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण सरकार मुद्दाम मराठा-ओबीसी संघर्ष पेटवत आहे. कोण काय मिळवतो, कोण काय गमावतो, हे लोकांनाही समजत नाही. मात्र दोन समाजांना अस्वस्थ करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.”
advertisement
यावेळी छगन भुजबळांवर झालेल्या टीकेचा उल्लेख करत आव्हाड म्हणाले की, “ज्येष्ठ नेत्याचा असा अपमान हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. भुजबळ हे ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पोटात, गळ्यात लाथ मारा आणि मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशा वक्तव्यांचा मी निषेध करत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
advertisement
हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की त्यात काय मिळाले. हे प्रकरण पारदर्शक नाही,” असे ते म्हणाले.
सरकारमधील नेते जर बोलत नसतील तर ओबीसींचे काय हाल आहेत. मराठा ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमीनदार मराठा आज अल्पभूधारक झाला. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar NCP : मराठा-ओबीसी आरक्षण वादावर पवारांची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement