शरद पवारांचे निष्ठावान समर्थक, कराडचे माजी आमदार शामराव अष्टेकर यांचे निधन; पुण्यात आज अंत्यसंस्कार
- Published by:Prachi Amale
- Reported by:Vishal Patil
Last Updated:
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर शामराव अष्टेकर हे कराड उत्तर मधून आमदार म्हणून निवडून आले.
सातारा : कराडचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे वयाच्या ९१ वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले. शरद पवारांचे निष्ठावंत आणि समाजवादी काँग्रेसमधून दोन वेळा आमदार राहिले होते.. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण होतं. विशेषतः पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर शामराव अष्टेकर हे कराड उत्तर मधून आमदार म्हणून निवडून आले. विशेषतः पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. शामराव आष्टेकर हे शरद पवार यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कराड आणि सातारा परिसरातील क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं. त्यांच्या निधनामुळे कराड आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
दोन वेळा आमदार
शामराव आष्टेकर यांनी १९८५ आणि १९९० अशा २ वेळा कराड उत्तरचे प्रतिनिधित्व केलं होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. कराडच्या स्थानिक राजकारणावरही त्यांची एकेकाळी पकड होती. आज सायंकाळी ६:३० वाजता वैकुंठधाम नवीपेठ पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 08, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांचे निष्ठावान समर्थक, कराडचे माजी आमदार शामराव अष्टेकर यांचे निधन; पुण्यात आज अंत्यसंस्कार