अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार, छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ

Last Updated:

मनोज जरांगेंच्या दिल्लीला जाणार वक्तव्याचा देखील भुजबळांनी चांगला समाचार घेतला आहे.

News18
News18
नागपूर : अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते, असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. अंतरवालीतील आंदोलनासंदर्भात पोलिसांशी सकाळी बोलू असं ठरलं, त्यापूर्वी रात्रीतून काही बैठका झाल्या, यात बैठकांमध्ये शरद पवारांचे काही आमदार होते असा दावा भुजबळांनी केला. आहे नागपुरात समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळांनी दावा केला आहे. भुजबळांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटीलच्या आंदोलनामध्ये महिला होत्या म्हणून तिथ महिला पोलीस तैनात करण्यात आले होते. जरांगे ला बोलायला गेले तर सकाळी बोलू सांगितलं, रात्री मिटिंग झाली घरावर दगड ठेवले सकाळी पोलीस आले तेव्हा तुफान दगडफेक झाली. यामध्ये रोहित पवार यांचे आमदार होते. महिला पोलिसांना मारहाण झाली 84 लोक जखमी झाले. शरद पवार यांनी विचारायला हवं होतं का झालं? तिथ पवार गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा बाबा (जरांगे) मोठा झाला.
advertisement
जरांगेंच्या दिल्लीला जाणार वक्तव्याचा देखील भुजबळांनी चांगला समाचार घेतला आहे. आम्हाला दिल्ली जाता येत नाही का?देशभरात ओबीसी समाज आहे. आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू म्हणतो त्याला माहिती आहे का मंडल आयोग? ते काय आझाद मैदान आहे का मागण्या मान्य झाल्या. सरकार दबावाखाली येणार असेल तर ओबीसीचा दबाव काय असतो हे आम्ही दाखवून देऊ, असा थेट इशारा भुजबळांनी दिला.
advertisement

ओबीसीचे नुकसान, आम्ही कोर्टात जाणार: छगन भुजबळ

एकाने पत्र काढलं कोणाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला तयार आहे, उद्या कोणी पण सर्टिफिकेट देतील. जरांगेने पहिल्या GR मधला पात्र शब्द काढून टाकायला सांगितलं एक तासात GR बदलला. ओबीसीचे नुकसान झाले आम्ही कोर्टात जाणार आणि लढणार आहे. नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमली तशी बोगस कागदपत्रे तपासण्यासाठी समिती नेमा, सरकारने काढलेला GR मंत्रिमंडळ पुढे ठेवला नाही, घाईघाईने GR काढला आहे. शपथपत्राच्या आधारे जातीचे निर्णय घेणे कायद्यात नाही ही पद्धत देशात कुठेही मान्य नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.
advertisement
छगन भुजबळ म्हणाले, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करु नका असे मला सांगतात. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगतात. गरजेपेक्षा जास्त झाले तर धक्का लागणार, धक्का कसा लागणार नाही... शाहू महाराजांना आरक्षण का हवं ते सांगितलं. मला हवं तसं घाणेरडं बोलतात, मला पक्षाला देखील सांगणं आहे, मतासाठी शांत न रहाता बोललं पाहिजे. जे जरांगेंच्या बाजूला उभे राहतील त्याला धडा शिकवणार हे ठरवावे लागेल. मी आमदारकीला उभं राहिलो हा महाशय कुठ गेले नाही दोन दिवस माझ्या मतदार संघात राहिले, माझी मत कमी झाली नाही. मला सगळ्या पक्षांना सांगायचंय ,आम्ही आता शांत राहिलो. आमदार आणि खासदार तिकडे पाया पडणार असाल तर आम्ही देखील आता तयार आहोत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार, छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement