'जरांगेंच्या आंदोलनामागे पवारांचा हात असेल तर...', प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज

Last Updated:

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. या आरोपांना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

News18
News18
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही. एकतर मराठ्यांना आरक्षण मिळेल, नाहीतर माझी अंत्ययात्र निघेल, अशी आरपारची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. आता जरांगे यांची प्रकृती देखील घालावत चालली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. सुरुवातीपासून जरांगे यांच्या आंदोलनाला पवारांचं पाठबळ असल्याचं देखील सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय. सत्ताधाऱ्याच्या या आरोपांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शर पवारसाहेबांचा हात असेल, तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, असं ओपन चॅलेंज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे.
advertisement
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपांबाबत विचारलं असता शशिकांत शिंदे म्हणाले, सरकारकडे डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल, तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. पवारसाहेब बोलले नाहीत तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधारी नेते म्हणत असतात. शरद पवार आंदोलनाबाबत काही बोलले, तर त्यांचा आंदोलनामागे अदृश्य हात आहे, असा आरोप करतात.
advertisement
त्यामुळे मराठा आंदोलनामागे नेमका कुणाचा हात आहे? की मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत, की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत, ते सरकारने बघावं. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून राजकारण करणं बंद करावं. माझी सरकारला विनंती आहे की, कोणाची काय भूमिका आहे, हे न बघता, सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच या-त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावे, अशी माझी मागणी आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जरांगेंच्या आंदोलनामागे पवारांचा हात असेल तर...', प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement