शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या 2 भाविकांचं अपहरण, हॉटेलात ठेवलं डांबून, 5 जणांच्या टोळीला अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचं मालेगाव परिसरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बब्बू शेंख, प्रतिनिधी मालेगाव: महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचं मालेगाव परिसरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव येथील पाच आरोपींनी या दोघांचं अपहरण करून त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं. मात्र, या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच अपहरणकांड उघडकीस आणलं. पोलिसांनी अपहरण झालेल्या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचही आरोपींना जेरबंद केले आहे.
अपहरण आणि सुटका
टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल असं अपहरण झालेल्या दोन भाविकांची नावं आहेत. दोघंही मुळचे ओडीसा राज्यातील रहिवासी असून ते महाराष्ट्रातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. शिर्डीला देव दर्शनासाठी जात असताना मालेगाव भागात त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी या दोघांना मालेगावजवळील कौळाने येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं.
advertisement
पोलीस सूत्रांकडून घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी कौळाने येथील हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अपहरणकर्त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका केली.
पाच आरोपी जेरबंद
अपहरण आणि डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. समाधान देवरे, रोशन अहिरे, सोमनाथ आहेर, गणेश मेंढावत आणि शिवम पैठणकर असं अपहरणकर्त्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांनी या पाचही आरोपींविरुद्ध अपहरण आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिर्डीला दर्शनासाठी आलेल्या या दोघांचे अपहरण आरोपींनी नेमके कोणत्या कारणासाठी केले, यामागे खंडणीचा उद्देश होता की आणखी काही, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Oct 19, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या 2 भाविकांचं अपहरण, हॉटेलात ठेवलं डांबून, 5 जणांच्या टोळीला अटक








