राज ठाकरेंचं मौन, पितृपक्षानंतर ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

Last Updated:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत शिवसेना नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

News18
News18
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही काळात दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत.
ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबई महानगर पालिकेसह अनेक ठिकाणी त्यांची ताकद दिसून येईल, अशा चर्चा आहेत. त्या अनुषंगाने दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जातायत. युती होणार याबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेकदा संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली होती.
advertisement
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते, तर शाखाप्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत मोठं विधान केलं आहे, चर्चा सुरू आहे, मनसेबाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्त्वाची बैठक होत आहे, सध्या पितृपक्ष सुरू आहे, तो संपताच मोठे गौप्यस्फोट आणि धक्के हे दिलेच जातील, असा दावा शितल म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, राज ठाकरे युतीबाबत एक चक्कार शब्द देखील काढत नाहीत, मात्र उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यातून ही वक्तव्य होत आहेत. दिघे साहेबांबाबत राऊत जे काही बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने पाहत नाहीत. ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही यावेळी म्हात्रे यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरेंचं मौन, पितृपक्षानंतर ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement