आदित्य ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या भाषणाचा किस्सा, ठाकरे बंधूंनी कुठे उभा राहून ऐकलं भाषण? ते फोटो समोर

Last Updated:

Aditya Thackeray Speech Mumbai Shivaji Park: आदित्य ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या घणाघाती भाषणाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. मुंबईतील जनतेने शिवसेनेला का मतदान करावे, हे आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीसांची केलेली मिमिक्री, मुद्द्यांवरून भाजपवर केलेली टीका तसेच आगामी पाच वर्षात मुंबईकरांसाठी करणार असलेले प्रकल्प, अशी गुंफण त्यांनी आपल्या भाषणातून केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आदित्य ठाकरे यांच्या घणाघाती भाषणाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. त्यांचे हेच भाषण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील ऐकल्याचे फोटो समोर आले आहेत. या भाषणाचा खास किस्सा आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या समाज माध्यमांवरून सांगितला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करीत आदित्य ठाकरे म्हणाले, हा फोटो- फक्त उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र उभे आहेत एवढाच नाहीये, ह्यापेक्षा जरा अधिक खास आहे! मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या प्रचारसभेत मी बोलेन किंवा नाही हे नक्की नव्हतं कारण दोन दिग्गज नेते सभेला संबोधित करणार असताना एवढा वेळही असेल का ह्याबद्दल शंकाच होती.
advertisement

भाषणासाठी माझे नाव जाहीर झाले, आणि ते दोघे घाईघाईने गच्चीवर आले

पण माझे नाव जाहीर झालं आणि मी भाषणाला उभा राहिलो. त्यावेळी माझे बाबा आणि काका (राज ठाकरे-आदित्य ठाकरे) दोघांनाही मी भाषण करणार आहे ह्याची कल्पना नव्हती. पण माझे नाव जाहीर होताच काकाच्या घरी असलेले ते दोघेही घाईघाईत गच्चीवर आले आणि तिथून माझा जाहीर संवाद ऐकू लागले.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Aditya Thackeray (@adityathackeray)



advertisement

त्या दोघांसमोर भाषण कसं करणार होतो?

मला ह्याबद्दल तेव्हा कल्पना नव्हती आणि नव्हती हेच बरंय, कारण त्या दोघांसारख्या उत्तम वक्त्यांसमोर भाषण? कसं करणार? पण तो क्षण छायाचित्रात टिपला जाणं हे माझ्यासाठी खास आहे. ह्या अमूल्य क्षणासाठी अवी गोवारीकर ह्यांचे आभार, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आदित्य ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या भाषणाचा किस्सा, ठाकरे बंधूंनी कुठे उभा राहून ऐकलं भाषण? ते फोटो समोर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement