Amol Khatal Attack: 'कानाजवळ बुक्का...' संगमनेरमध्ये कुणी केला हल्ला? खुद्द अमोल खताळ यांनी सांगितलं नाव, पहिली प्रतिक्रिया
- Published by:Sachin S
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
मी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आलो होतो त्यामुळे तिथे काही लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले. बाहेर पडल्यानंतर लोकांच्या भेटीगाठी घेत होतो. पण...
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अखेरीस हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. 'काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली आणि सभा झाली होती. त्यामुळे व्यथित झालेल्या लोकांनी कुणालातरी पुढे करून हल्ला करण्याचा प्रयत्न असावा. पण
हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो' अशी प्रतिक्रिया अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेरमध्ये शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाला गेले होते. खांडगाव इथं एका व्यक्तीने खताळ यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी समोर आला. त्यानंतर त्याने खताळ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर खताळ समर्थकांनी मालपानी लॉन्सला घेराव घातला होता. अखेरीस पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. अमोल खताळ यांनी संपूर्ण घटनेबद्दल माहिती दिली.
advertisement
'मी ७.१० वाजता पोहोचलो, तिथे गेल्यावर सगळ्यांना गणपतींच्या शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पाला हार घातला. ७.३० वाजेच्या सुमारास मालपानी लॉन्समध्ये संगमनेर फेस्टिव्हलचं उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाला सुरुवात करून दिली होती. मी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आलो होतो त्यामुळे तिथे काही लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले. बाहेर पडल्यानंतर लोकांच्या भेटीगाठी घेत होतो. पण त्याच गर्दीमध्ये कुठून तरी तो आला आणि त्याने डाव्याबाजून कानाजवळ बुक्का मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणासोबत काही जण असू शकतात. हा पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. ते पोलीस तपासातून समोर येईल' अशी प्रतिक्रिया खताळ यांनी दिली.
advertisement
तसंच, गेल्या काही दिवसांपासून संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या प्रकरणाचा पोलीस तपास करतील आणि सत्य समोर आणतील. पण काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य अशी रॅली आणि सभा झाली होती. त्यामुळे काही व्यथीत झालेल्या लोकांनी हल्ला करून आणला असावा, असा संशयही खतााळ यांनी व्यक्त केला.
Location :
Sangamner,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 28, 2025 11:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amol Khatal Attack: 'कानाजवळ बुक्का...' संगमनेरमध्ये कुणी केला हल्ला? खुद्द अमोल खताळ यांनी सांगितलं नाव, पहिली प्रतिक्रिया