लोकसभेतच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांना शिवसेनेकडून NDA ची ऑफर, सभागृहात एकच कल्लोळ
- Published by:sachin Salve
Last Updated:
विधानसभा निवडणुकीनंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पेव फुटलंय. अशातच शिवसेनेचे खासदाराने थेट काँग्रेसच्या खासदारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली.
दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पेव फुटलंय. उबाठाचे 6 खासदार आणि काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशातच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफरच दिली आहे. लोकसभेत बोलतानाच म्हस्के यांनी ऑफर दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.
advertisement
राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणावर बोलत असताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
'अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमर्गीयांसाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आमच्याकडे एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन आहे. तर विरोधकांमध्ये कॉन मॅन आहे. जे कधी अभय मुद्रा योजनेवरून आरोप करतात. तर कधी बटाटे मशीनमध्ये टाकून सोनं देण्याची भाषा करतात. अशा नेत्यांकडून आम्ही काही अपेक्षा ठेवू शकत नाही. विरोधक हे महिलांचा अपमान करण्याची कधीच संधी सोडत नाही, असं म्हणत म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
advertisement
"महाराष्ट्राच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांना कधीच भाषण करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी एनडीएमध्ये यावं, अशी ऑफरच म्हसके यांनी दिली.
ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर 'ऑपरेशन टायगर'ची कुजबूज सुरू झाली आहे. उबाठाचे 6 खासदार आणि काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षात फुटपडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत उबाठाचे 9 खासदार निवडून आले.. पण विधानसभा निवडणुकीत मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं कमबॅक करत 57 आमदार निवडून आले. पण केंद्रातील सत्ता समिकरणांचं गणित लक्षात घेत उबाठाचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार अशी गरमागरम चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
February 07, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेतच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांना शिवसेनेकडून NDA ची ऑफर, सभागृहात एकच कल्लोळ