advertisement

शिवरायांचा पुतळा झाकला, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नृत्यांगणाचा बिभत्स डान्स, कोल्हापुरातील घटनेचा VIDEO VIRAL

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील वडणगे गावात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर सलोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील वडणगे गावात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याने झाकून ठेवत नृत्यांगनांचा बिभत्स धिंगाणा घालण्यात आला. या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तिथे एक मोठे स्टेज उभारण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमादरम्यान चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्याचा कार्यक्रम उरकला गेल्याचा आरोप होत आहे. लावणीच्या नावाखाली 'ॲटम साँग्स'वर अत्यंत अश्लील आणि बिभत्स हालचाली करत नृत्यांगनांनी डान्स केल्याचं समोर आलं आहे.
advertisement

शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

शिवजयंती हा महाराष्ट्राचा अस्मितेचा सण आहे. अशा पवित्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा पुतळा झाकून अश्लील कार्यक्रम करणे, हे अत्यंत निंदनीय असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ग्रामपंचायतीचे स्पष्टीकरण

या वादावर ग्रामपंचायतीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हा कार्यक्रम महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आला होता, असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. मात्र, कार्यक्रमाचे स्वरूप आणि ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा झाकून हा अश्लील प्रकार घडला, त्यावर नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवरायांचा पुतळा झाकला, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नृत्यांगणाचा बिभत्स डान्स, कोल्हापुरातील घटनेचा VIDEO VIRAL
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement