लग्नाआधी अफेअर, प्रेयसी गरोदर, पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेचं कांड समोर, गौरीसोबत कुठे बिनसलं?

Last Updated:

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.

News18
News18
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असून त्या डॉक्टर होत्या. ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पण अवघ्या ९ महिन्यातच त्यांचा संसार मोडला आहे.
आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. मयत डॉक्टर गौरीचे वडील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जेच्या अफेअरबद्दल माहिती दिली आहे. अनंत गर्जे याचं एका किरण नावाच्या महिलेसोबत प्रेम संबंध होते. यातून संबंधित महिला गरोदर देखील राहिली होती. याबाबतचे काही कागदपत्रं गौरीला घरात सापडले होते. यात लातूर येथील एका गर्भवती स्त्रीचं समंतीपत्र आणि जाहीरनामा होता. यात पतीचं नाव म्हणून अनंत भगवान गर्जे असं नमूद होतं. घराच शिफ्टींग करत असताना गौरीला ही कागदपत्रं आढळून आले होते. यानंतर गौरीचं पती अनंत गर्जेसोबत बिनसलं.
advertisement
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर अनंत गर्जे हा गौरीला ब्लॅकमेल करत होता, असंही गौरीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. संबंधित अफेअरबद्दल घरच्यांना सांगू नको. ते घरी आले तर आपण चिठ्ठीत तुझं नाव लिहून आत्महत्या करेन, अशा प्रकारची धमकी अनंत गौरीला देत होता, असा मोठा खुलासा गौरीच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुलीच्या आत्महत्येबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. हा घातपात असू शकतो, याची सविस्तर चौकशी करावी, असंही त्यांनी तक्रारीत मागणी केली आगे.
advertisement
या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस वडिलांनी सादर केलेल्या पुराव्यांचा पाठपुरावा करत आहेत. यावर अनंत गर्जेची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यावेळी गौरीने आत्महत्या केली, तेव्हा आपण घरी नव्हतो, असं त्याने सांगितलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाआधी अफेअर, प्रेयसी गरोदर, पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेचं कांड समोर, गौरीसोबत कुठे बिनसलं?
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement