Sindhudurg Tourism: गडकोट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोकणातील प्रसिद्ध किल्ला पर्यटकांसाठी खुला तर राजकोटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात

Last Updated:

Sindhudurg Tourism: किल्ल्यांवर जाऊन पावसाळी पर्यटन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Sindhudurg Tourism: गडकोट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोकणातील प्रसिद्ध किल्ला पर्यटकांसाठी खुला तर राजकोटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात
Sindhudurg Tourism: गडकोट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोकणातील प्रसिद्ध किल्ला पर्यटकांसाठी खुला तर राजकोटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात
सिंधुदुर्ग: महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि गडकिल्ल्यांचा इतिहास लाभलेला आहे. महाराजांच्या किल्ल्यांपैकी काही किल्ले कोकणात देखील आहेत. पावसाळ्यात या किल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी होत असते. किल्ल्यांवर जाऊन पावसाळी पर्यटन करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. तर, गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे राजकोट किल्ला अजूनही बंद आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचा पदपथ खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसान झालेल्या भागाची दुरुस्ती हाती घेतली. त्यामुळे पर्यटन हंगाम असूनही पर्यटकांसाठी किल्ल्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची निराशा होत आहे.
advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीचं काम वेगाने सुरू आहे. कोसळलेल्या पदपथाखाली पुन्हा मुरुम भरून त्यावर सोलिंग, पीसीसी, आणि आरसीसी ग्रेड स्नॅपची कामं पूर्ण झाली आहेत. आजूबाजूच्या जांभ्या दगडांच्या पुनर्बांधणी आणि चबुतऱ्यावरील ग्रेनाईटची देखील दुरुस्ती झाली आहे. ड्रेनेज आणि इतर आवश्यक दुरुस्त्या सध्या अंतिम टप्यात आहेत.
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दुरुस्ती झाल्यावर किल्ल्याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल. तज्ज्ञांकडून आवश्यक ती प्रमाणपत्रं मिळाल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलं जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला होईल. पर्यटकांना किल्ल्यात कधीपासून प्रवेश मिळणार याबाबतची अधिकृत माहिती योग्य वेळी सार्वजनिक बांदकाम विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली जाईल, असंही इंगवले यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurg Tourism: गडकोट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कोकणातील प्रसिद्ध किल्ला पर्यटकांसाठी खुला तर राजकोटची दुरुस्ती अंतिम टप्प्यात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement