Mumbai Weather: पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये काही भागांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
मुंबईत मध्य रात्रीपासूनच जोरदार सरी सुरू झाल्या असून सकाळपासून सुद्धा अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम, तर कधी जोरदार पावसाचे प्रमाण होतं, मात्र आज पावसाचा जोर काहीसा अधिक दिसून येतोय. दिवसात काही भागांत जोरदार सरी बरसतील, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मुंबईचे हवामान दमट राहील आणि कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सियस तर किमान तापमान 25 अंश सेल्सियस इतके राहील.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसांपासून या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. आज हवामान विभागाने ठाणे आणि नवी मुंबईसाठी यलो अलर्ट दिला आहे. येथील काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू आहेत आणि दुपारनंतरही त्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाडा जाणवणार असला तरी पावसाच्या जोरदार सरींनी गारवा देखील जाणवेल.
advertisement
पालघर जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून पावसाची परिस्थिती कायम आहे. आजही पालघरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून यलो अलर्ट जाहीर केला आहे. सकाळपासून काही भागांत रिमझिम पाऊस सुरू झाला आहे, तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान साधारण 30 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सियस इतके राहील.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील प्रमुख जिल्ह्यांत आज पावसाचा जोर जास्त राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून मुसळधार सरींचा इशारा दिला आहे. दोन्ही जिल्ह्यांत सकाळपासूनच जोरदार पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत आणि दिवसभरात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.